
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी
तालुक्यातील मौजे सवना येथील छोट्याशा गावात राहून जिद्द व चिकाटीच्या जोरावर मध्यवर्ती शासकीय रुग्णालय उल्हासनगर मुंबई येथे टेक्निशियन या पदावर निलेश राऊत यांची नियुक्ती
कुठल्याही क्षेत्रात यशाचा पल्ला गाठण्यासाठी जिद्द व चिकाटीची अत्यंत आवश्यकता असते पण आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा त्या परिस्थितीवर मात करून रात्रंदिवस स्वतःला अभ्यासात झोकून मौजे सवना येथील एका गरीब कुटुंबातील शेतमजुराचा मुलगा शासकीय सेवेत दाखल झाल्याचा आदर्श तालुक्यातील सुशिक्षित नवतरुण युवकांसह विद्यार्थ्यांनी घेतल्यास नक्कीच त्यांना सुद्धा यशोशिखरावर जाणे अवघड नसल्याचे हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक शेठ यांनी त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना सांगितले व येणाऱ्या काळात निलेश अजुन पोलीस खात्यातील मोठ्या पदावर जाणार आहे त्यामुळे त्याला पुढील वाटचालीस सुद्धा खूप खूप शुभेच्छा
मौजे सवणा येथील सामान्य कुटुंबातील गरीब शेतकरी सतीश राऊत यांचा मुलगा नीलेश राऊत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागात सामान्य ग्रामीण रुग्णालय उल्हासनगर मुंबई येथे टेक्निशियन या पदावर 22 एप्रिल रोजी रुजू झाला आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेख रफीक साईट यांच्या अध्यक्षतेखाली सवना नगरीतील बुद्धविहारात 23 एप्रिल रोजी त्यांच्यासह आई वडिलांचा एक छोटा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास विशेष अतिथी सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव बीरकलवार व हनिप सर यांनीही उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संयोजक सरपंच तथा खरेदी-विक्री संघाचे सदस्य परमेश्वर गोपतवाड यांनी प्रास्ताविक केले तर शेवटी आभार नंदकुमार राऊत यांनी मांनले
यावेळी उपस्थित उपसरपंच प्रतिनिधी सोनबा राऊत ,ग्रामपंचायत सदस्य संदीप भाऊ बीरकलवार ,श्रीमती सुलोचनाबाई राऊत, सिद्धार्थ राऊत, मारोतराव पाटील, अक्कलवाड, नंदकुमार राऊत ,संतोष संभाजी अंनगुलवार, विनायक शिंदे ,भीमराव राऊत ,संदीप भाऊ भुसाळे, सतीश भाऊ गोपतवाड, प्रमोद भुसाळे, आशिष राऊत, तुषार राऊत, राहुल पंडित यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती
