
प्रतिनिधी:शफाक शेख,चंद्रपूर
चंद्रपूरचे युवा समाजसेवक याकूब पठाण मागील काही वर्षापासून गरिबांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या प्रकारे धडपड करत असतात . देशात कोरोनछ शिरकाव झाल्यापासून सर्वसामान्य मजूर वर्गाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे .अश्यातच ज्यांना कोरोना ची लागण झाली त्यांना महागडी औषध घेणं परवडत नसल्याने याकूब पठाण यांनी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना कोरोना च्या औषधी वाटण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
जेव्हा देशात लॉकडाउन तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. गरिबांमध्ये धान्य, किराणा सामान, खाऊ घालणे अश्या प्रकारे मदद केली.या लॉकडाउन मध्ये चंद्रपुर ची परिस्थिति खुप जास्त खराब असल्या मुळे त्यांनी गरजु व कोरोना झालेल्या पेशंट ला त्यांच्या कडून मोफत औषधी देण्याचा निश्चय केला आहे !
आपण पुढे येऊन गरीबांची मदत करावी असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.
