समुद्रपूर तालुका प्रमुख व जामचे युवा उपसरपंच अजय खेडेकरची मागणी —

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, समुद्रपूर


ग्रामीण रुग्णालय समुद्रपुर येथे ऑक्सिजनयुक्त २५ बेड ची व्यवस्थाकरण्याबाबत
आज रोजी समुद्रपूर येथील तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी मॅडम वर्धा यांना
निवेदन देण्यात आले की समुद्रपुर तहसीलच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे. सध्याची परिस्थिती बघता कोविड रुग्णांना ग्रामीण रुग्णालय समुद्रपुर येथे ऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था फार कमी असल्यामुळे रुग्णांना सेवाग्राम, सावंगी, हिंगणघाट, नागपुर येथे उपचारा करिता जावे लागत आहे. काही रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे निराश होऊन परत यावे लागत आहे, आपण ग्रामीण रुग्णालय समुद्रपुर येथे कोविडरुग्णांन करिता २५ बेड ची ऑक्सीजनयुक्त व्यवस्था केली तर रुग्णांना वरील गावी उपचाराकरिता जाण्या येण्याचा खर्च, श्रम, वेळ व होणारा मनस्ताप टाळता येईल याचं सोबत डॉक्टर व नर्स चा स्टाफ वाढविण्यात यावा. या करिता वरील मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या ही निवेदनातुन विनंती करण्यात आली.
यावेळी रोशन थुटे, दिनेश गलांडे,अमोल झाडे,आकाश झाडे,तुषार उरकांदे,अमोल अवघडे उपस्थित होते.