यवतमाळच्या नागरिकांची राळेगाव च्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरण साठी मोठी रांग


राळेगांव तालुका प्रतिनिधी:रामभाऊ भोयर


शासनाने 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांना लस घेण्याचे आव्हान केल्यामुळे यवतमाळच्याअनेक नागरिकांनी राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासंदर्भात मोठी रांग लावली 45 किलोमीटर चे अंतर कापून राळेगाव सारख्या छोट्याशा शहरात लस घेण्यासाठी आल्यामुळे गावातील नागरिकांना व खेड्यापाड्यातील नागरिकांना ही लांबच लांब रांग पाहून आपला नंबर लागेल की नाही याची शाश्वती नसल्याने माघारी जावे लागले याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ प्रकाश चिमणानी यांनी सर्व नागरिकांनी ऑनलाइन रजिशन केल्यामुळे त्यांना येथे लस देणे क्रमप्राप्त आहे असे सांगितले कोणताही नागरिक कोठेही लस घेऊ शकतो त्यामुळे सर्वांना लस उपलब्ध करून दिला जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले…लस न मिळाल्याने अनेक जेष्ठ नागरिक व इतरांना परत जावे लागले त्यामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे हे विशेष…