सेवक तर नाही पण सेवका पेक्षा कमी नाही कोरोना काळातही युवकांची अनोखी समाजसेवा

लोकहीतमहाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन करा आणि मिळवा प्रत्येक बातमी सर्वात आधी

https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY


प्रतिनिधी:वरून त्रिवेदी


काही काळापासून संपुर्ण भारतावर व आपल्या महाराष्ट्रावर कोरोना महामारीचे संकटं आलेले असून या संकटाला तोंड देण्यासाठी प्रतेक मनुष्य प्रयत्न करत आहे , परंतु हे युवक ज्या क्षेत्रामध्ये आहे ते आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका मधील छोटेसे गाव नागरी, उखर्डा . या छोट्याश्या खेड्यामध्ये सुद्धा कोरोणा चां प्रादुर्भाव वाढत आहे . अश्या परिस्तिथी मध्ये लोकांचे जगणे कठीण झाले आहे , गोर गरीबांचे हाल होत आहेत अश्यातच हे तीन युवक आपली माणुसकी जोपासत आहेत एक सच्चा रुग्णसेवक महेश पाटिल, मिथुन कुडे , आकाश बावणे यांनी स्वतःची चार चाकी वाहने हे जील्हातील गोर गरीब रुग्णांना गाडी आमची डिझेल तुमचे या तत्वावर रुग्णासाठी मोफत सुरु केली आहे गेल्या कित्येक वर्षापासून हे युवक असेच रुग्णसेवा करत आहे , दिवस रात्र केव्हा पण रुग्णाच्या सेवेसाठी तत्पर असतात . राज्यमंत्री लोकनेते आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी हा रुग्णसेवेचा वसा हाती घेतला , गौरव दादा जाधव, नयन दादा गजु भाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शाखाली हे युवक रुग्णसेवा करत आहे . या महामारीत जिथे काही माणसं माणुसकी विसरून पैसे जमा करत आहे तिथे या युवकांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे .