
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर।
गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या रोगांनी राळेगांव शहरात व तालुक्यात उच्छांद मांडला आहे.आणि कोरोणा महामारी मध्ये एक अनामिक प्रकारची भीती सर्वसामान्य जनतेला होती व आहे ती म्हणजे चाचणी केली तर आपण पाॅझीटिव तर येणार नाही ना ?पण मात्र प॔च्याहत्तर टक्के नागरिकांना जे की विविध आजाराने ग्रासले होते. त्यांना योग्य मार्गदर्शन,योग्य उपचार तो ही खिशाला परडविणारा मिळाल्याने आज तालुक्याची परीस्थिती आटोक्यात आहे व याचे खरे श्रेय इतर कोरोना योद्यांप्रमाणे खाजगी डॉक्टरांही जाते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यासह तालुक्यात चांगलाच हाहाकार माजविला आहे.गेल्या दोन महिन्याच्या या कालावधीत तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास पंच्याहत्तर टक्के रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याने शासकीय रुग्णालयाचा भार हलका झाला असं म्हटलं तर आजच्या घडीला वावगं ठरणार नाही. शहरात व तालुक्यात जवळपास शंभरच्या वर खाजगी डाँक्टरांचे दवाखाने आहे. एका आठवड्यात आराम झाला नाही तर रुग्ण व त्यांचे नातेवाईकांची जिल्हा स्थानी तज्ञ डाँक्टर कडे जाण्याची मानसिकता तयार होते. ज्याची ऐपत आहे त्यांचे ठीक आहे. पण यवतमाळ येथील खाजगी दवाखान्यात आठ ते दहा दिवसा चे बील पाहिल्यावर चक्कर आल्या शिवाय राहात नाही. रुग्ण बरे होण्यासाठी जास्त अवधी लागला पण रुग्ण चांगले ठणठणीत झाले आहेत. ग्रामीण रुग्णालय राळेगांव येथे,कोविड सेन्टर वर बरेच कोरोणा पाॅझीटिव्ह रुग्ण बरे झाले आहे. मात्र या कालावधीत काही असामाजिक तत्व,विघ्नसंतोषी खाजगी डाँक्टरांच्या विरोधात नाहक बोंबाबोंब करतात. या बोंबाबोंबी करणाऱ्याकडे “बोलणाऱ्यांचे दात दिसते, करणाऱ्यांचे काम दिसते” या प्रमाणे डॉक्टरांनी दुर्लक्ष करीत आपले कार्य सुरूच ठेवले याची परिणिती आज कमी होत चाललेली खाजगी रुग्णालयांतील गर्दीवरून दिसून येते आहे.राळेगाव शहरासह तालुक्यातील कोरोनावर नियंत्रण आणन्यासाठी ज्या प्रमाणे महसूल विभाग राळेगाव चे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे, ठाणेदार प्रकाश तुनकलवार, मुख्याधिकारी अरुण मोकळ, गटविकास अधिकारी रविकांत पवार, तालुका आरोग्य अधिकारी गोपाळ पाटील,ग्रामीण रुग्णालय राळेगांव चे डाँक्टर प्रकाश चिमणाणी, वडकीचे ठाणेदार विनायक जाधवसह तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांचं मोठे योगदान आहेतच हे नाकारता येत नाही.
