नागरी गावातील देशी दारूच्या भट्टी करिता घेण्यात आली ग्रामसभा ,नागरिकांचा कडाडून विरोध

दि .29/12/22गुरुवार ला नागरी येथे देशी दारू भट्टीला ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता ग्रामपंचायत नागरी येथील ग्राम पंचायत सदस्यांनी
व त्यांच्या वरिष्ठ नेते मंडळी यांनी नागरी येथील अशिक्षित गावकऱ्यांना एका सही चे रुपये 500 रुपये मिळणार आहे असे खोटे आमिष दाखवून व तुमच्या वार्ड करीता ग्राम सभेत कामाची मंजूरी मिळणार आहे असे खोटे सांगून देशी दारुभट्टी सुरु करण्याकारिता लोकांच्या धोक्याने ग्राम सभेत सहया घेण्यात आल्या. ही ग्राम सभा ज़िल्हा परिषद प्रा. शाळा सुरु असताना लहान मुलाना दोन खोलीमध्ये कोंबून ग्रामपंचायत कमेटीने तथा त्यांच्या वरिष्ठ नेत्यानी देशी दारूच्या भट्टी करीता ना हरकत प्रमाणपत्र देण्याकारिता ग्राम सभा बोलवली या मध्ये नेते मंडळीनी मोठ्या प्रमाणात दारू भट्टी मालकाकडून पैशाची देवान घेवान झाल्याचा आरोप जनतेंकडून होत आहे. घेण्यात आलेल्या हया सभेने खालील मुद्दे उपस्थित होत आहे.

1) गावातील कोणत्या नेत्याने दारू भट्टी मालका कडून पैशाची देवाण घेवान केली?
2) ज़िल्हा परिषद शाळा सुरु असताना ही ग्रामसभा शाळेत कशी घेण्यातआली?
3)नूतन नेहरू विद्यालय नागरी येथील शिक्षक या दारू भट्टी सुरु करण्याकरीता घेण्यात आलेल्या ग्राम सभेत शालेय कामकाजाच्या वेळेत उपस्थित कसे?
शालेय प्रशासन त्याच्यावर कोणती कार्रवाही करेल?
4)देशी दारू भट्टी ला ना हरकत प्रमाण पत्र देण्या मागे नेत्यांचा इतका उत्साह का?
कोणी कित्ती पैसे घेतले,पोलिस प्रशासन करवाई करेल का?
5)घेण्यात आलेल्या सह्या वैध की अवैध? याची सुद्धा शहानीशा व्याला पाहिजे ?
6) ग्रामसेवकाने सभेत लोकानसमोर खोटी माहिती देवून सभेला सुरवात केली व सभेत सहया दुसऱ्या विषया वर घेतल्या, म्हणून ग्रामसेवक वर कायदेशीर करवाई कोण करेल..?

इत्यादि प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरना मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष घालतील काय? तसेच जि. प. शाळेत नियम बाह्य पणे घेण्यात आलेल्या सभेला जिल्हा परिषद प्रशासन( माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग) कोणती कार्यवाही करेल? या कडे लोकांचे लक्ष लागले आहे?