व्यापारी संघटना चिमूर तर्फे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन,दुकाने उघडण्याची परवानगी द्या

प्रतिनिधी:गुरुदास धारणे,चिमूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉक डाउन जाहीर केल्याने अत्यावश्यक दुकाने सोडून सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश होता.त्यानुसार नियमांचे पालन करीत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.परंतु दुकाने बंद असल्यास पोट भरणार काशी असा सवाल विचारत आम्हाला दिलेल्या वेळेत दुकाने उघडण्याची परवानगी साठी निवेदन देण्याचे ठरवले .त्यानुसार व्यापारी संघटना चिमूर च्या वतीने सामान्य दुकानावरील निर्बंध हटऊन मर्यादित अवधीमध्ये दुकाने सुरु ठेवण्याकरिता आज दिनांक 18/06/2021 मा,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार संजय नागतिलक व उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांचे मार्फ़त देण्यात आले, उपविभागीय अधिकारी यांच्यासी चर्चा करताना चिमूर शहरातील, सर्व दुकाने याना दिवस निश्चित करून सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, उपाध्यक्ष श्यामसुंदर बंग, दिनेश कटाने, मनीष पटेल, आशिष असावा, प्रवीण बारापात्रे, श्रीहरी सातपुते उपस्थित होते.