बल्‍लारपूर, मुल, पोंभुर्णा येथे ऑक्‍सीजन प्‍लॅन्‍ट उभारणार – आ. सुधिर मुनगंटीवार

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

चंद्रपुर: काल १९ मे रोजी बल्‍लारपूर शहरानजिकच्‍या तालुका क्रिडा संकुलात तयार होणा-या कोविड रूग्‍णालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूरसाठी २० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर, मुलसाठी ०५ ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर, पोंभुर्णासाठी ०५ ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर वितरीत केले. हे ३० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या आमदार निधीतुन उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. तसेच बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा येथे ऑक्सिजन प्लांट उभारणार असे आश्वासन दिले.
माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूरतर्फे मायक्रोटेक कंपनीच्‍या माध्‍यमातुन बल्‍लारपूर पंचायत समितीला ६० ऑक्‍सीमीटर वितरीत करण्‍यात आले.

चंद्रपूर जिल्‍हयातील कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या चिंताजनक आहे. मृत्‍युचा दर देखील मोठया प्रमाणावर आहे. कोरोना रूग्‍णांना योग्‍य उपचार मिळत नसल्‍यामुळे ते दगावत आहेत. आरोग्‍य व्‍यवस्‍था कोलमडलेली आहे. अशा परिस्‍थीतीत “भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन प्रशासनाला आम्ही सहकार्य करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहोत. व्‍हेटीलेटर, ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर, ऑक्‍सीमीटर, रूग्‍णवाहीका आदींच्‍या माध्‍यमातुन आमचे सेवाकार्य अव्‍याहतपणे सुरू आहे. बल्‍लारपूर येथे ऑक्‍सीजन प्लांट उभारण्‍याबाबत आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत. नागरिकांनी देखील सुरक्षीतता बाळगावी व खबरदारी घ्‍यावी,” असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, काशी सिंह, मनिष पांडे, निलेश खरबडे, अजय दुबे, समीर केने, ऍड. रणंजय सिंह, मुख्‍याधिकारी विजय सरनाईके, सिध्‍दार्थ मेश्राम, प्रभाकर भोयर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.