
. दि.18/05/21 ला संध्याकाळी 7:30 च्या सुमारास एक मोठी घटना घडली. अमित श्रीराम राऊत व पियूष लोणारे हे 18 तारखेच्या संध्याकाळी मोटार सायकल ने सचिन पुरकेे यांचे घरासमोरून जात असता त्यांनाआडवे होऊन हातामध्ये कुऱ्हाड, लोखंडी रॉड, चाकू घेऊन आडवे झाले. व पियुष याला कुऱ्हाडीचा घाव मारताच तो घटनास्थळावरून पळून गेला .नंतर अमित राऊत सचिन पूरके, देवरावजी पुरके व, सारिका मंडाले हया तिघांनी मारहाण करीत जखमी केले त्यानंतर मोटर सायकल सुद्धा पेटवून दिली मोटार सायकल पल्सर गाडी क्र.MH-32 AT-6920 ही जळून खाक झाली.त्यानंतर घटनास्थळी पोलिस येऊन गाडी विजवली व आरोपींना अटक करून लॉकअप मधे टाकले. ह्या घटनेमध्ये गंभीर रित्या जखमी झालेला अमित राऊत सेवाग्राम हॉस्पिटल मध्ये भरती असून त्याची प्रकृती गंभीर आहे. आरोपी सचिन पुरके,देवराव पुरके व सारिका मंडाले , यांचेवर 307,324,435,427,294,,506,34भा. द.वी. कलम अंतर्गत गुन्हा नोदविण्यात आला असून या प्रकरणात, पियूष लोणारे यांच्यावर कलम 326 काउंटर गुन्हा दाखल आहे. असे सूत्रानुसार माहिती झाले असून पुढील तपास पी. एस. आय.पाटणकर यांचा मार्गदर्शनात सुरू आहे
