भाजयुमोने रक्तदान करुन साजरा केला पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच दि.१७ सप्टेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचेवतीने स्थानिक मारोती वार्ड येथील दुर्गा माता मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
उपरोक्त रक्तदान शिबीराचे उद्घाटन आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजयुमोचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर, जि.प.सभापती मृणालताई माटे ,नगरसेवक सोनु गवळी, सुनिल डोंगरे, नगरसेविका शारदाताई पटेल, जिल्हा महामंत्री युवा मोर्चा कवीश्वर इंगोले, बजरंग दल तालुका अध्यक्ष विक्रम ठाकूर, माजी युवा मोर्चा अध्यक्ष हिंगणघाट सौरभ पांडे, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा विठू बेनीवार, भाजपा तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
जागतिक कोरोना महामारीच्या संकट काळात रूग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. याकरीता रक्तदानाची गरज लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चाच्या हिंगणघाट शाखेने या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. रक्तदान हे गरजू रुगणांना जीवनदायी ठरणार असून या लोकोपयोगी कार्यासाठी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या कार्यातूनच प्रेरणा मिळाली, भविष्यातही अशाच प्रकारे आमच्या हातुन सामाजिक कार्य घडत राहिल. अशी ग्वाही भाजयुमोचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांचेकडून यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांना जन्मदिनानिमित्त उदंड व उत्तम आरोग्य लाभावे यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली. रक्तदान शिबीराला तज्ञ डॉक्टरमंडळी व चमूचे सहकार्य लाभले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी भाजयुमो हिंगणघाट शहर अध्यक्ष सोनु पांडे, संघटन महामंत्री गौरव तांबोळी, महामंत्री अतुल नंदागवळी, स्वप्निल शर्मा, लिलाधर मांडवकर, उपाध्यक्ष भुषण आष्टनकर, मुकेश सिसोदिया, तुषार हवाईकर, नितीन नांदे, सोशल मीडिया प्रमुख योगेश्वर जिकार, सचिव रितिक दांडेकर, निखिल हिवंज, अक्षय हारघोडे, निरज सैनी, बाबु चौहान, बाबु सतेजा, संपर्क प्रमुख सुरज युवनाथे, राहुल दारुणकर,सतीश खोंडे इत्यादि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले