

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे
आज दिनांक १५/०५/२०२१रोज शनिवारला पालकमंत्री मा. ना. श्री सुनिलजी केदार साहेब वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर आले असता वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेत असतांना हिंगणघाट तालुक्यात कोरोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून असलेली अत्यंत कमी पडत आहे ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात कोरोनापासुन उपचार भयंकर अडचणी येत आहेत त्यामुळे हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीरबांबु कोठारी यांनी पालकमंत्री श्री केदार साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात कोवीड सेंटरची मान्यता लवकरात देण्यात यावी जेणेकरून त्याचा फायदा ग्रामीण भागात व संपूर्ण तालुक्यातील जनतेला होईल. त्याला पालकमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच हिंगणघाट बाजार समितीचे वतीने वडनेर येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची तयारी व त्यांचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी असल्याचे सभापती अँड सुधीरबाबु कोठारी यांनी बोलून दाखविले.याबाबत लवकरच सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले .यावेळी अँड सुधीरबाबु कोठारी यांचेसोबत निवेदन देतांना हिंगणघाट बाजार समितीचे संचालक श्री मधुकरराव डंभारे, उत्तमराव भोयर, वडनेर ग्रामपंचायत सदस्य श्री गुरूदयालसिंगजी जुनी, खरेदी विक्री उपाध्यक्ष श्री राजुभाऊ भोरे, पांडुरंगजी निंबाळकर, कृष्णाजी महाजन उपस्थित होते.
