
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर
तालुक्यातील मौजे दिघी विरसनी पिंपरी परिसरात कोरोणा महामारी मध्ये येथील रेती माफियांनी रेतीचे अवैध उत्खनन करून दिघी परिसरा सह इतर ठिकाणी रेतीचे मोठ मोठे साठे जमा करून ठेवले होते ह्याच्या बातम्या प्रकाशित होताच हिमायतनगर चे कर्तव्यदक्ष तहसीलदार गायकवाड साहेब,मंडळ अधिकारी पंगे साहेब,तलाठी शिंदे
यांनी स्वतः जाऊन येथील 60 ब्रास चे रेती साठे जप्त करून एक धडाकेबाज कारवाई केली त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे
कोरोणा महामारी मध्ये संपूर्ण देशा सह महाराष्ट्र परेशान असल्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्वत्र लॉक डाऊन लावण्यात आले होते या लॉक डाऊन चा गैर फायदा घेत हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी , कमारी , विरसनी, कोठा तांडा, व वाडी परिसरातील रेती माफियानी त्यांच्या परिसरात अवैध रेती चे मोठमोठे ढिगारे साठवून ठेवले होते याची बातमी प्रकाशित होताच हदगाव येथील उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब यांच्या आदेशावरून हिमायतनगर चे तहसीलदार गायकवाड साहेब यांनी संबंधित सजाचे मंडळ अधिकारी पंगे साहेब व तलाठी शिंदे साहेब यांना सोबत घेऊन दिघी परिसरातील जाऊन साठ ब्रास चा रेती साठा जप्त केला त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील रेती माफियांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात पहायला मिळत आहे
पैनगंगा नदी काठी असलेल्या मौजे कामारी, पिंपरी, विरसणी ,दिघी ,पळसपुर कोठा, कोठा तांडा सह टाकळी परिसरात मागील कित्येक दिवसापासून येथील रेती माफियांचा गोरखधंदा सुरू आहे त्यामुळे तेथील परिसरातील तलाठी व मंडळाधिकारी यांना हाताशी धरून त्या परिसरात रेती चे मोठं मोठे साठे जमा करून ठेवले आहेत ह्या बाबी कडे महसुलच्या अधिकाऱ्यांचे मात्र साफ दुर्लक्ष होत होते ही बाब हिमायतनगर शहरातील शिवसेना उप तालुका प्रमुख विलास वानखेडे यांनी मा.तहसिलदार यांचेकडे मागील काही दिवसा पूर्वी लेखी तक्रार करून ह्याचे G.O. टॅग चे फोटो मा.
जिल्हाधिकारी यांना पाठवले होते ह्या बाबी च्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या याची दखल घेऊन दिनांक 21 मे रोजी माननीय तहसीलदार गायकवाड साहेब यांनी त्यांच्या परिसरात जाऊन तेथील रेती साठ्या वर कारवाई केली शहरात व तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांनचे घरकुल बांधकाम सुरू आहेत त्या नागरिकांना हे रेती माफिया बे भाव दराने रेती विक्री करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहेत अशी बातमी प्रकाशित करताच हदगाव येथील उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर चे तहसीलदार गायकवाड साहेब यांनी कारवाई केली त्यामुळे परिसरातील रेती माफिया मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
