वार्ड क्रमांक 12 मधील बंद असलेले बोर चालू करा व सौर ऊर्जेचे पोल दुरुस्त करून द्या :- नागेश शिंदे यांची मागणी

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर

हिमायतनगर प्रतिनिधी शहरातील वार्ड क्र 12 हे शहरांमध्ये सर्वात मोठा वार्ड म्हणून ओळखला जातो या वॉर्डाची लोकसंख्या अंदाजे दीड हजार च्या वर आहे नगरपंचायत हद्दीतील केवळ नऊ बोर द्वारे ह्या वॉर्डातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो पण इन हिवाळ्यातच येथील अनेक बोर मागील किती दिवसापासून बंद आहेत त्यामुळे येथील नागरिकांना पाणीटंचाईमुळे इतरत्र ठिकाणी जावे लागत आहेत सद्या वार्डात केवळ तीन ते चार बोर चालू असल्याचे नगरपंचायत कडून सांगण्यात येते आहे त्यामुळे इतर बंद असलेले बोर तात्काळ सुरू करून द्या व बंद असलेले सौर ऊर्जेचे पोल सुद्धा दुरुस्त करून द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नागेश शिंदे यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे एका लेखी पत्रा द्वारे केली आहे

हिमायतनगर शहर हे 25 हजार लोकसंख्याच्या वर लोकवस्ती असलेले शहर आहे त्यात वार्ड क्रमांक 12 हे सर्वात मोठा वार्ड म्हणून प्रसिद्ध आहे या वॉर्डात दीड हजार च्या वर लोकसंख्या आहे त्यामुळे येथील नागरिकांना भर हिवाळ्यात पाणीटंचाई ला समोर जावे लागत आहे वार्डातील चार-पाच बोर आज घडीला बंद अवस्थेत आहेत मागील कित्येक दिवसापासून नगरपंचायत ला सांगून सुद्धा ते दुरुस्त करण्यात आले नाहीत त्यामुळे येथील नागरिकांना हिवाळ्यात पाणीटंचाई ला तोंड द्यावे लागत आहे व सध्या हिमायतनगर तालुक्यात मागील कित्येक दिवसांपासून रात्रीला चोरीचे सत्र वाढत आहेत त्यामुळे हिमायतनगर शहरात वार्ड क्रमांक 12 मध्ये नगरपंचायत ने लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जेची एलईडी पोल लावण्यात आले त्या पोल’ पैकी काही पोल मागील कित्येक दिवसांपासून बंद आहेत तिथे रात्रीला अंधार पडत आहे त्यामुळे त्या पोलची तात्काळ दुरुस्ती करून या वार्डात रात्रीला लख्ख प्रकाश करण्यात यावा जेणे करून बस स्टँड लागत असलेल्या वार्डात रात्रीला चोरी होण्याची भीती निर्माण होणार नाही अशी मागणी या वॉर्डातील सामाजिक कार्यकर्ते नागेश परमेश्वर शिंदे यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे केली आहे