ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रामध्ये आॅक्सीजन पुरवठा करून कोविड सेंटर म्हणून घोषित करा:लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांचे जिल्हा अधिकारी यांना निवेदन

,


प्रतिनिधी…परमेश्वर सुर्यवंशी


हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जवळपास 65 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यामध्ये नागरिकांना कोरोणाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये दुरवस्था होत असल्याकारणाने आज हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जनता कोरोणाच्या महा बिमारी मुळे त्रस्त झाली आहे त्या अनुषंगाने आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोणाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आपण नांदेड जिल्ह्यातील 65 प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येक केंद्रावर 10 ऑक्सीजन बेडची व्यवस्था केल्यास तेथील नागरिकांना सोप जाईल आणि त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था होईल जर का आपण असे केले ज्या केंद्रामध्ये बेडची व्यवस्था केल्यास त्या केंद्रांमध्ये टेस्टिंग साठी आलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी योग्य होईल व त्यांच्यावर वेळेवर उपचार केला जाईल आणि कोरोणाचा प्रादुर्भाव थांबेल त्या ठिकाणी कोणताही समस्यानिर्माण होणार नाही असे जर केले तरी कोरोनाच्या सख्या मोठ्या प्रमाणात घट निर्माण होईल म्हणून आपण आपल्या हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी कोविड सेंटर म्हणून त्याची घोषणा करावी व येणाऱ्या दोन दिवसांमध्ये कोविड सेंटरवर ऑक्सिजन पुरवठा सही प्रत्येक केंद्रावर दहा बेडची व्यवस्था होईल असे निवेदन आपले लोकनेते बाबुरावजी कोव्हळीकर यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी तात्काळ दोन दिवसाच्या आत मी बेड उपलब्ध करून देईल असे देखील जिल्हाधिकारी यांनी बाबुराव पाटील कोव्हळीकर यांना सांगितले