हिमायतनगर शहरात दैनिक मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर यांची भेट


जागृत देवस्थान परमेश्वर मंदिर येथील परमेश्वर महाराजांचे दर्शन व प्रतिनिधी तर्फे सत्कार संपन्न

हिमायतनगर (प्रतिनिधी)

नांदेड जिल्ह्या सह आंध्रप्रदेश तेलंगणा राज्यात प्रसिद्ध असलेले हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिर येथील शंकराचे अवतार असलेल्या परमेश्वर महाराजांचे दर्शन दैनिक मराठवाडा नेता चे मुख्य संपादक रामेश्वर जी बद्दर साहेब यांनी आज सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले यावेळी हिमायतनगर येथील प्रतिनिधी नागेश शिंदे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केलाहिमायतनगर शहर हे पांडवकालीन मूर्तिकारांचे शहर होते या हिमायतनगर शहराचे पूर्वी वाढोणा हे नाव नावाप्रमाणेच गावचा पण इतिहास आहे या गावची पार्श्वभूमी अशी की हिमायतनगर शहरास खूप मोठा संस्कृतिक वारसा लाभलेला आहे त्यामुळे आज प्रथमच दैनिक मराठवाडा नेता चे मुख्य संपादक रामेश्वर बद्दल साहेब यांनी येथील परमेश्वर मंदिरा स भेट दिली व येथील गावकऱ्यांशी चर्चा केली त्यानिमित्ताने परमेश्वर मंदिर कमिटीचे सदस्य तथा जेष्ठ नागरिक लक्ष्मणरावजी शंकरगे साहेब ,भोयर गुरुजी ,शिवसेना उपतालुका प्रमुख विलास काका वानखेडे ,नगराध्यक्ष कुणाल राठोड,अनिल भोरे, परमेश्वर सूर्यवंशी यांनी येथील प्रतिनिधी नागेश शिंदे यांच्या वतीने रामेश्वर बद्दर यांचा नागरी सत्कार केला यावेळी रामेश्वर बद्दल यांनी असे सांगितले की हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिरास भेटून देऊन खरोखरच खूप आनंद वाटला असे त्यांनी यावेळी सांगितले