

लोकहीतमहाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY
सहसंपादक:प्रशांत बदकी
वरोरा शहरातील मध्यभागी गांधी चौक च्या बाजूला असणाऱ्या चाळीतील दुकाने सुरू ठेवत नियम वाऱ्यावर सोडत वस्तूंची विक्री करीत असल्याचे लक्षात येताच नगर परिषद ,तहसील कार्यालय व पोलीस प्रशासन मिळून संयुक्त कारवाई करण्यात आली.कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन न केल्याने दुकाने सील करण्याची कारवाई केलेल्या काही ठराविक दुकानांचे सील हटवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगराध्यक्ष अहेतशाम अली याच्यावर कारवाई व्हावी हा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांनी लावून धरला आहे.
एकीकडे अन्य राजकिय पक्ष शांत बसले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष वैभव डहाने हे एकटेच गुन्हा दाखल व्हावा यासाठी निवेदन देत आहेत त्यामुळे नगराध्यक्ष अहेतशाम अली यांच्या समर्थकांना त्यांची भूमिका रुचत नाही आहे.त्यामुळेच वैभव डहाने याना जीवे मारण्याची धमकी वजा इशारा देण्यात आला आहे .या विरोधात माझ्या जीवाचे काही झाल्यास नगराध्यक्ष अहेतशाम अली व सादिक अली जबाबदार असतील अशी लेखी तक्रार वरोरा पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगराध्यक्ष अहेतशाम अली यांच्यावर कारवाई न झाल्यास कोर्टात जाऊ असे वैभव डहाने यांनी सांगितले आहेत.
