पर्यावरण दिननिमित्त कृषी दुतांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

प्रतिनिधी :जुबेर शेख

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत आनंद निकेतन कृषी महाविद्यायातील कृषी दुतातर्फे खेमजई येथे जागतिक पर्यावरण दिननिमित्त पर्यावरणाचे महत्त्व व त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम याविषयी माहिती देण्यात आली आणि सामजिक हिताच्या दृष्टिकोनातून पर्यावरण समस्यांकडे अधिक जागरूकपणे पाहणे याची अत्यंत गरज आहे. असे ग्रामवसियांना पटवून सांगितले, यावेळी उपस्थित मान्यवर मनीषा चौधरी सरपंच खेमजई विश्वनाथ तुरानकर पोलीस पाटील यांच्या सहकार्याने उपस्थित गावकरी मंडळी दादाजी चौधरी, गंगाधर चौधरी,गुरू तुरानकर,गणपत तुरानकर,गणपत कपटे, वसंता मानकर, शिवराय निभ्रट, धनराज गायकवाड, व सहभागी विद्यार्थी आदर्श खोब्रागडे, आनंद मुंगल, आणि रीतिक नागदेवते या कृषी दुतानी मार्गदर्शन केले,कार्यक्रमा साठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रा. डॉ . सुहास पोद्दार, प्रा .डॉ. रामचंद्र महाजन, प्रा.डॉ. स्वप्नील पाचभाई, प्रा.डॉ.मुकुंद पातोड, प्रा.डॉ.सतीश इमडे, यांच्या मार्गदर्शनखाली कार्यक्रम पार पडला. यामध्ये गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.