वृक्ष संवर्धन ही काळाची गरज :- पोलीस निरीक्षक भगवान कांबळे

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर पोलिस स्थानकात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या हस्ते हे वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन ही एक काळाची गरज आहे प्रत्येक नागरिकांनी आप आपल्या परिसरात व आपल्या भागात एक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करावे असे आव्हान कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी केले

पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिमायतनगर येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवान कांबळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन व पोलीस उपनिरीक्षक देवकते यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशन परिसरात व पोलीस कॉलनी परिसरात अनेक झाडांचे वृक्षारोपण करून ते झाड कसे जगवता येईल त्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची, व कुपनाची व्यवस्था करून हा दिवस साजरा केला

     

यावेळी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व नगरपंचायत चे मुकादम संदीप उमरे, विठ्ठल बनसोडे, पल्लवी इंटरप्राईजेस चे सुपरवायझर गजानन गंदेवाड, राहुल कांबळे , दिगंबर सह अडी जन उपस्थित होते