
हिमायतनगर प्रतिनिधी
शहरातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते पण यंदा अवकाळी पावसाने त्या दिवशी हजेरी लावल्यामुळे शिव जयंती महोत्सव समितीचा नियोजित कार्यक्रम रद्द करून तो आज दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी परमेश्वर मंदिर समोर भव्य भजन संगीत कार्यक्रमासह रक्तदान शिबीर ठेऊन ह्या वर्षीची शिवजयंती साजरी करण्यात आली
शहरातील परमेश्वर मंदिर समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रथम: प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन केले यावेळी प्रमुख मान्यवरांनी असे सांगितले की शिवरायांच्या विचारांचे अनुकरण करून आपण आपल्या जीवनात यशस्वी मार्गक्रमण करणे ही एक काळाची गरज आहे कोरोना सारख्या महामारीने सर्व देश परेशान असताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून यावर्षीचा शिवजन्मोत्सव हिमायतनगर शहरात एकदम शांततेत साजरा करत हनुमान संगीत भजनी मंडळ पाथरड व श्रीकृष्ण संगीत भजनी मंडळ जामठी यांच्या शिव भजनाचे जंगी सामने व श्री परमेश्वर मंदिर समोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी दि.24 फेब्रुवारी रोजी करून ही शिवजयंती एकदम आनंदात साजरी केली
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, समद खान पठाण , नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे,काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर, गणेश शिंदे ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख विलास वानखेडे, भाजपा तालुका अध्यक्ष आशिष सक वान, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, श्यामजी रायेवार पांडू अप्पा तुप्तेवार , डॉक्टर राजेंद्र डॉ.दिगंबर वानखेडे, डॉ.गणेश कदम वामन राव मिराषे,गजानन हारडपकर, प्रशांत देवकते , श्रीकांत सूर्यवंशी, गोविंद शिंदे ,सचिन माने,सह आदी जन या वेळी उपस्थित होते
