केळापूर तालुक्यातील ( BSNL) बीएसएनएल सेवा व्हेंटिलेटरवर

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर

दूरध्वनी क्षेत्रात क्रांतिकारी असे बदल झाले आहे, अशात मात्र केळापूर तालुक्यातील बीएसएनएल सेवा विस्कळीत झाली आहे, त्यामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये रोष पहावयास मिळत आहे.

भ्रमणध्वनी क्षेत्रात कितीही क्रांतिकारी बदल झाले तरी प्रशासकीय यंत्रणा ही BSNL भारत संचार निगम लिमिटेड द्वारे संदेशवहन व संपर्क चालत असतो, परंतु मागील काही वर्षात खाजगी कंपन्यांना जास्त महत्व दिल्यामुळे, भारत सरकारच्या मालकीची असलेली बीएसएनएल सेवा मागे टाकल्या गेली. निम्म्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेतली, अनेक अधिकाऱ्यांना शासनाने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले, परिणामी संपूर्ण देशात बीएसएनएलच्या सेवेवर विपरीत परिणाम झाला.

गेल्या काही महिन्यांपासून केळापूर तालुक्यात बीएसएनएल लैंडलाइन सेवासोबतच बीएसएनएल व जीएसएम प्रीपेड सेवा अनेक ठिकाणी ऑक्सिजनवरतर काही ठिकाणी मृतप्राय झालेली दिसते, पांढरकवडा, पहापळ, रुंझा, मोहदा परिसरातील व बहुतांश ठिकाणी बीएसएनएल सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक नागरिक रोष व्यक्त करत आहे व बीएसएनएलच्या या नाकर्तेपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे..