सावधान :चंद्रपुरात ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवून ब्लॅकमेलिंग केल्याचे उघड,तक्रार दाखल

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

.फेसबुक, मेसेंजर व व्हाट्सअप माध्यमावर बँक खात्यात पैसे जमा करा, अन्यथा तुम्हाला समाज माध्यमावर बदनाम करू,अशा पद्धतीने ‘हनी ट्रॅप’ चे प्रकार वाढले आहे

चंद्रपुरातील एका कुटुंबातील तरुण मुलाला अशाच पद्धतीने एका सुंदर तरुणीने अशील छायाचित्र तयार करून समाज माध्यमावर सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलाला शनिवारी सकाळी समाज माध्यमावर एका सुंदर मुलीने ‘हॅलो ‘हाय’ हा संदेश पाठवला. मुलगी सुंदर दिसल्याने मुलगाही तिच्या जाळ्यात अलगद अडकला. त्यानेही तिला उत्तर दिले. मुलाकडून प्रतिसाद मिळाल्याने बघून भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. दोघा मध्ये संवाद झाल्यानंतर काही वेळातच मुलाच्या ‘व्हाट्सअप’ वर एका सुंदर मुली सोबत चे अशील छायाचित्र पाठविण्यात आले.त्या मध्ये सुंदर मुली सोबत या मुलाचे ही संगणकावर तयार केलेले अर्ध नग्न छायाचित्र होते. सदर अशी छायाचित्रे बघून तो घाबरला, गोंधळला, मात्र स्वतः ला सावरत त्याने घडलेला प्रकार वडिलांजवळ कथन केला. त्या प्रतिष्ठित कुटुंबाने थेट शहर पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. शहर पोलिसांनी सायबर क्राईम शाखा येथे त्यांना पाठवले. तिथे सायबर पोलिसांनी मुलाची भ्रमनध्वनी तपासून त्यातील सत्यता शोधून काढली. पोलिसांनी त्यामध्ये संबंधित तरुणीने मुलाचे संगणकावर बनावट छायाचित्र केल्याचे दिसून आले. दरम्यान “हनी ट्रॅप’च्या प्रकारामुळे तरुण-तरुणींमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांनी समाज माध्यमाचा वापर काळजीपूर्वक करावा, स्वतःचे फेसबुक प्रोफाईल लॉक करून ठेवावी,अनोखळी व्यक्तींना मेसेंजर वर संवाद साधू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.