
प्रतिनिधी:तेजस सोनार
संपूर्ण राष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न असलेलं अयोध्या येथील बांधल्या जात असलेल्या प्रभू श्री राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी केला आहे. ज्या जमिनीची विक्री 1.8 कोटी मध्ये खरेदी केली गेली तीच जमीन 5 मिनिटात ट्रस्ट ने18.5 कोटी मध्ये खरेदी केली गेली आणि दोन्ही ठिकाणी डॉ.अनिल मिश्र च कसे साक्षिदार बनले असा सवाल संजय सिंग यांनी केला आहे. तरी या आरोपांची लवकरात लवकर उच्चस्तरीयचौकशी व्हावी आणि सत्य समोर आणावे अशी मागणी आयोध्या येथील हनुमान गढी चे महंत राजू दास यांनी केली आहे परंतु जर आरोपात तथ्य नाही निघाले तर संजय सिंग यांच्यावर 50 कोटींचा मानहानी दावा टाकण्याची घोषणा देखील त्यांनी केली .
