
प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर
कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना दिले निवेदन.
चिमूर
महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला शेततळे व शेतबोडी या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला असता अनुदान प्रलंबित असल्याने शेती हंगाम सुरू झाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असतांना याची दखल आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी घेतली असून चंद्रपूर जिल्ह्यातील व चिमूर विधानसभा क्षेत्रातील शेततळी व शेतबोडी अनुदान देण्याची मागणी करीत कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राज्यात सिंचनाच्या पाण्याअभावी शेतकऱ्यांना सतत नापिकी चा सामना करावा लागत असल्याने शासनाच्या कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे व शेतबोडी योजना सुरू करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे व शेतबोडीच्या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील व चिमूर विधानसभा क्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला असताना मात्र अजूनही अनुदान मिळण्यापासून वंचित आहे.
कोविड 19 मुळे शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेतून भरडला जात असताना शेतकऱ्यांना हक्काचे अनुदान मिळालेले नाही त्यात चिमूर तालुका 2,75,828 रुपये तर नागभीड तालुक्यातील 11,30,701 रुपये आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेततळे 75, शेतबोडी 59 असे एकत्रित 58, 79,000 रुपये अनुदान शिल्लक आहे. तेव्हा शेती उपयोगी कामात प्रचंड आर्थिक सामना करावा लागत आहे चिमूर विधानसभा क्षेत्रसह जिल्ह्यात एकूण 58.79 लक्ष अनुदान प्रलंबित आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रासह चंद्रपूर जिल्ह्यातील शेततळी व शेतबोडी लाभार्थ्यांच्या हक्काच्या अनुदानासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पुढे सरसावले आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्र सह चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित अनुदान शासनाने तात्काळ देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी केली असून कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना दिलेल्या निवेदनासह कृषी आयुक्त पुणे, विभागीय आयुक्त नागपूर,विभागीय कृषी सहसंचालक नागपूर , जिल्ह्याधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक चंद्रपूर यांना सुद्धा प्रतिलिपी निवेदन दिलेले आहे.
