
प्रतिनिधी:सुमित शर्मा,सटाणा
लोकहीत महाराष्ट्र च्या ग्रुप ला जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/LY8Gdhff1LyCgc4gEuBfuA
सटाणा, दि.१७ जून :- स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने सटाणा येथील बस स्थानक परिसरात आज तीव्र निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी समता परिषद तालुका अध्यक्ष संजय बच्छाव, माजी उपसभापती धर्मराज खैरनार,मा. उपनगराध्यक्ष भारत खैरनार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रांतिक सदस्य वैभव गांगुर्डे-महाजन यांच्या नेतृत्वाखाली
आंदोलन करण्यात आले.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याने समता परिषदेसह सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने आज राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन करत राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावे, त्यांची जनगणना करण्यात यावी यासह विविध न्याय मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या.
यावेळी वैभव गांगुर्डे म्हणाले की,राज्यात जवळपास 64 हजार जगावर ओबीसी प्रवर्गातील उमेदवार विविध ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. तेच जर आरक्षण रद्द केले तर ओबीसींचा राजकीय अंत होण्यास वेळ लागणार नाही.
सर्व ओबीसी समाजबांधवांनी ना. भुजबळ साहेबांच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहून ओबीसींच्या संघर्षासाठी त्यांना राजकीय व न्यायालयीन लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरून साथ देऊया,व आपला अधिकार शाबूत ठेवूया. त्यासाठी शासनास वेळोवेळी जागे करून देण्यासाठी आपल्याला असेच यापुढे देखील रस्त्यावर उतरावे लागेल असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रांतिक सदस्य वैभव गांगुर्डे यांनी व्यक्त केले,
यानंतर माजी उपसभापती धर्मराज खैरनार यांनी बोलतांना सांगितले की,
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात सामाजिक पातळीवर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवीत आहोत. आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात असून शासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. ओबीसींच्या मागण्याबाबत सुरु केलेली ही आमची रस्त्यावरची लढाई ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत सातत्य पूर्ण असे आंदोलने सुरु राहतील असे माजी उपसभापती धर्मराज खैरनार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आंदोलकांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचलेच पाहिजे, उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे, जय ज्योती जय क्रांती, ओबीसीचे राजकीय आरक्षण, हा आमचा हक्क आहे. हक्काचे आरक्षण आमची चळवळ, न्याय नाही हक्क आहे, आरक्षण ओबीसींच पक्के आह, ओबसी आरक्षणाचा हक्काचा वाटा, केंद्र सरकार लवकर द्या इंपेरिकल डाटा,
नही चलेगी नही चलेगी दादागिरी, नही चलेगी, ओबीसींच्या आरक्षणाला जाऊ देऊ नका तढा, ओबीसी आक्रोश आता देशव्यापी लढा यासह विविध घोषणा यावेळी आंदोलकांच्या वतीने यावेळी देण्यात आले.आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,भाजपा ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष सुरेश मोरे,यशवंत कात्रे,मनीष ढोले,प्रकाश अहिरे,गोविंद वाघ,विलास दांडगव्हाळ,योगेश अमृतकार,वैभव बोरसे,प्रशांत बागुल,हरिभाऊ खैरनार, गौरव शिंदे,सागर शेलार,दादाजी खैरनार,अनिल अहिरे,मुरलीधर खैरनार, पोपट खैरनार,मोहन खैरनार,मोहन गवळी, बबलू खैरनार,सुदर्शन जाधव,सोमनाथ शेलार,देवेंद्र बागुल,अजय अहिरे,उमेश जाधव, गणेश खैरनार, अंगद नानकर,राजेंद्र खानकारी, शंकर ढेपले,सुभाष बागुल,आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
