एक महिना कोरोनाला झुंज देऊन फ्लाइंग शीख मिल्खा सिंग जीवनाची लढाई हरले आहे. या आठवड्यात त्यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते, मिल्खा सिंगने 91 व्या वर्षी तर निर्मल मिल्खा सिंह 85 वर्षांचा असताना अखेरचा श्वास घेतला.
मिल्खा सिंग नुकतेच कोरोना निगेटिव्ह झाले होती, परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडण्यास सुरूवात झाली, त्यानंतर त्यांना चंदीगडच्या PGI रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला.
याच आठवड्यात त्यांचा पत्नीचे देखील निधन झाले होते. त्यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारालाही ते जाऊ शकले नव्हते कारण मिल्खा सिंग स्वत: आयसीयूमध्ये भरती होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिग्गज धावपटू मिल्खा सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर आपली व्यथा व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत “आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे. ज्यांनी देशाची कल्पनाशक्ती काबीज केली त्यांना असंख्य भारतीयांच्या हृदयात विशेष स्थान आहे.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने त्यांना लाखो लोकांचे आवडते बनविले. त्यांच्या मृत्यूमुळे मी दु: खी आहे. ”
आपल्या माहितीसाठी, फ्लाइंग शीख मिल्खा सिंगने 1960 मध्ये रोम ऑलिम्पिकच्या 400 मीटर शर्यतीच्या अंतिम सामन्यात चौथे स्थान पटकाविले होते. त्यांच्यावर एक खास चित्रपट देखील बनला होता ज्यात फरहान अख्तरने अभिनय केला होतो आणि तोच चित्रपट फार गाजला सुद्धा होता.
आज त्यांच्या निधनाने संपूर्ण देश दुःखाच्या शोकात आहे.