चिखली बु ते नालंदा नगर 2 किलोमीटर रस्ता त्वरित दुरुस्ती करा:मनसे

सहसंपादक:प्रशांत बदकी

वाशिम तालुक्यातील चिखली बु ते नालंदा नगर 2 किलोमीटर रस्ता त्वरित दुरुस्ती करण्यात यावा म्हणून मनसे ने 25-01-2021 ला निवेदन देण्यात आले होते आज ज़ोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जिल्हापरिषद मुख्याधिकारी,बांधकाम विभागाचे अभियंता खान यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात चिखली शाखा अध्यक्ष डिगांबर वैरागडे यांनी निवेदन दिले यावेळी महाराष्ट्र सैनिक गजानन वैरागडे मोहन कोल्हे ,विठ्ठल राठोड ,सतिश कडवे ,प्रतिक कांबळे आदी उपस्थित होते रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करा अन्यथा मनसे स्टाईल ने खड्यात बसून आंदोलन करण्यात येईल आसा ईशारा चिखली बु चे शाखा अध्यक्ष दिगंबर वैरागडे यानी दिला