
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
.
ताडोबा व्याघ्रप्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या भटाळी, किटली, पायली, तिरवंजा, चिंचोली या गावातील परिसरात ताडोबातील वाघाचे वास्तव आढळून आले आहे आणि यामुळे वाघाच्या भीतीने त्या गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका आठवड्यात 3, 4 जनावरांची वाघाने शिकार केली आहे,वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढल्यामुळे गावामध्ये दहशत निर्माण झाली असून गावकऱ्यांना आपली जनावरे राखायची चिंता वाढली आहे.
वाघ गावाजवळ येऊन शिकार करत आहेत त्यामुळे वाघाच्या दहशतीमुळे लोक घराच्या बाहेर पडायला घाबरत आहेत. गावालगतच कोळसाखाण असल्याने सुद्धा वाघाचा शिरकाव जास्त वाढला आहे, लोकांना रात्रोच्या वेळेस घराबही पडणे कठीण झाले आहे त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामात खूप अडथळे निर्माण होत आहेत. वनविभागाने लवकरात लवकर यावर तातडीने त्या परिसरातील वाघाचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे अशी मागणी भटाळी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन उपरे व आकाश थेरे यांनी एका निवेदनाद्वारे केली व वनअधिकारी श्री कारेकर साहेबांनी लवकरात लवकर वाघाला जेरबंद करू असे आश्वासन दिले.
