धानोरा येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

. राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225).

राळेगाव तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत राळेगाव तालुक्यातील धानोरा, वरध, वाढोणा बाजार येथे नवीन रूग्णवाहिका देण्यात आली आहे. तरी त्या रूग्नवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. रूग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी व रुग्णाकल्याण समितीच्या सभेसाठी अध्यक्षा सौ. उषाताई भोयर, चितंरजन दादा कोल्हे जि. प. सदस्य, राळेगाव प. स. सभापती प्रशांत भाऊ तायडे, उपसभापती शिला ताई सलामे, रूग्नकंल्याण समिती सदस्य डॉ शामसुंदररावजी गलाट, सदस्या दिक्षा ताई मुन, , सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ येनोकर, उपसरपंच विशालभाऊ येणोरकर, विजयराव चकोले , संजयराव कारवटकर सदस्य गटविकास अधिकारी रविकांतजी पवार, दिनेशजी वाईकर साहेब, वंजारी साहेब , डॉ. हस्तनंकर, डॉ. गावंडे, करोडदेव, अरविंदजी केराम सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व उपकेंद्राचे कर्मचारी हजर होते.