चिमूर तालुक्यातील हरणी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चिमूर तालुक्यात वन्यजीव-मानवी संघर्ष ठरतोय जीवघेणा

प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर


चिमूर-दिनांक २६ जुन २०२१ रोजी
हरणी येथील शेतकरी शामरावजी डोमाजी नन्नावरे हे शेतात नेहमीप्रमाणे काम करत असतांना सांयकाळी ५ते ६ च्या सुमारास अचानक दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला .
घटनेची माहिती होताच वनविभाग आणी पोलीस कर्मचारी तिथे पोहचले व पंचनामा करुन शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चिमुर येथे पाठविण्यात आले . वाघाच्या हल्यात एका शेेतकऱ्याचा जिव गेला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतीचा हंगाम असल्याने सर्व शेतकरी शेतात असतात त्यातच या भागात वन्यजीवांच्या वावर असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.