अपघात:चिमूर आर टी एम कॉलेज समोर 2 दुचाकी चा अपघात 2 ठार तर 1 गंभीर जखमी

प्रतिनिधी:गुरुदास धारने ,चिमूर

लोकहीत महाराष्ट्र ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IKn51mZMcJnEsm0h22grHT

आज दिनांक27.6.2021 .
ला 12 वाजता च्या सुमारास चिमुर वरुन एक किमी अंतरावर आर टी एम कॉलेज समोर दुचाकी -दुचाकीची समोरासमोर टक्कर होऊन दोघांचा जागेवरच मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी आहे.
चिमुर वरुन कान्पा कडे अजय महादेव राऊत व सनी छत्तीसगड हे एका दुचाकीवर कान्पाच्या दिशेने चालले होते आणि अतुल चौधरी नाचणभट्टी हे आपल्या दुचाकीने कामानिमीत्य चिमुर ला येत होते या दोन्हा दुचाकी मध्ये समोरासमोर टक्कर झाली या घटनेत दोन व्यक्ती मृत्यू मुखी पडले असून त्यात इंदिरा नगर चिमूर येथील अजय महादेव राऊत व सनी छत्तीसगड यांचा समावेश असून अतुल चौधरी नाचणभट्टी हा इसम जखमी असून त्यांचेवर उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरु आहे पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.