चंद्रपुरात कोरोना नियमाची सर्रास पायमल्ली, मुक्ताई धबधब्यावर तरुणांची प्रचंड गर्दी.

प्रतिनिधी:चैतन्य कोहळे

चंद्रपुरात कोरोना नियमाची सर्रास पायमल्ली, ताई धबधब्यावर तरुणांची प्रचंड गर्दी.

चैतन्य राजेश कोहळे,चंद्रपूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. महाराष्ट्रात
अनलॉक केल्यानंतर अनेक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मुक्ताई धबधबा परिसरात कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. विकेंडच्या निमित्ताने निसर्गरम्य मुक्ताई धबधबा बघण्यासाठी तरुणांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली. याबाबतचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यात व्हिडीओत भयावह दृश्य पाहायला मिळत आहे.
कारवाई केली जाणार का? नागरिकांचा संंतप्त सवाल

राज्यात डेल्टा वेरिएंटमुळे पुन्हा एकदा अनलॉकची परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चिमूर व्यापारी संघटनेने या गर्दीवर आवर घालण्याची मागणी केली आहे. गेली दीड वर्षे गर्दी होऊ नये यासाठी व्यापार ठप्प केला जात आहे. मात्र आता या धबधब्यावर होणाऱ्या गर्दीसाठी जबाबदार कोण, त्यांच्यावर कारवाई केली जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.

चंद्रपुरातील नवी नियमावली काय?

राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकार आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याकरीता निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहे. यानुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आजपासून बाजारपेठेची वेळ ( अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने /आस्थापना ) आता सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद राहणार आहे.

चंद्रपुरात टाळेबंदी संदर्भातील नवी नियमावली नुकतंच जाहीर करण्यात आली. यावेळी शनिवारी रविवारी म्हणजेच विकेंड दिवशी बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने / आस्थापना पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. तर लग्न समारंभासाठी 50 व्यक्ती तर अंत्यविधीकरीता 20 जणांना परवानगी असणार आहे