नवेगाव शिवारात क्षेत्र 49/50 च्या झालेल्या वाघाच्या हल्ल्यात महीला ठार

दर वर्षी या भागामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताची कटाई केली जाते. दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताची कटाई करत असताना दबा धरुन बसलेले वाघाने महीलेवर अचानक हल्ला केला व ती महीला जागेवर च मृत्यु मुखी पडली. त्या घटना स्थली एकुण 20/25 कामगार होते. मृत्यु मुखी पडलेल्या महिलेचे नाव: बारजाबाई संजय वाघाडे (39) तिला दोन मुली व पती असा छोटा परिवार आहे व ती बाम्हनगाव येथील रहिवासी आहे.


प्रतिनिधी:राहुल कोयचाडे