आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला चिमूर तालुक्यातील मौजा- जांभुळघाट येथील गरीब कुटुंबांला औषधोपचार करिता आर्थिक मदतीचा हात

प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर

चिमुर विधानसभा क्षेत्रात गरिबांच्या पाठीशी सदैव उभे असणारे मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब गरीब जनतेच्या प्रश्नासाठी लढत असतात.चिमुर विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मार्फत गरीब कुटुंबातील लोकांनां अन्न-किराणा किट वाटप तसेच भोजन व्यवस्था असे अनेक उपक्रम राबविले. विरोधक फक्त निवडणूक पुरते मदतीला दिसतात परंतु मा.आमदार साहेब सतत जनतेच्या मदतीला धावून येत असतात.

अशातच चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथील मुरलीधर बालाजी खेडकर यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची हालाकीची असल्याने त्या कुटूंबांचे मदतीकरिता संबंधित गावातील भाजपा पदाधिकारी श्री राजू भाऊ साठोने यांनी आमदार साहेबांना माहिती दिली असता तात्काळ
मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे सूचनेनुसार श्री.किशोर मुंगले युवा भाजपा तालुका अध्यक्ष चिमूर यांचे मार्गदर्शनात भाजपा पदाधिकारी श्री सुनील भाऊ किटे याच्या हस्ते गरजू कुटूंबांला औषधोपचार करिता आर्थिक मदत करण्यात आली.