ग्रामपंचायत चे थकीत बिल वसूल करण्यात येऊ नये ! सरपंच संघटनेची मागणी, चंद्रपूर जिल्हा सरपंच संघटने कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन

चंद्रपूरजिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींना महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील व पथदिव्याच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी सूचना देण्यांत आलेल्या असून विद्युत पुरवठा खंडित करू नये व जिल्हा परिषदेने वीज बिल भरावे ही मागणी सरपंच संघटने कडून होत आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचतीचा वीज प्रवाह पुरवठा महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनीने खंडित न करण्याचे आदेश पारित करण्याबाबतचे निवेदन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे व गणेश दामोदर चवले सरपंच एकोना तसेच माजी सरपंच साहेबराव ठाकरे व वरोरा तहसील येथील अनेक सरपंच व सदस्य यांचे नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदनातून केलेली असून जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना काल दिनांक २८/०६/२०२१ रोजी प्रत्यश भेटून व निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सदरचे विद्युत बिल थकीत असल्याने थकीत रक्कम वसुली न दिल्यास संबंधित ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात बाबत महावितरण कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांनी आपल्या कडील दिनांक १६/०६/२०२१ चे पत्रानुसार संबंधित ग्रामपंचायतीचा महाराष्ट्र शासनाकडून १५ व्या वित्त आयोग निधीतून वीज बिलाचा भरणा करण्या बाबतचा सूचना देखील दिलेल्या आहे.
वास्तविक पाहता मागील व दोन वर्षापासून संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूची महामारी असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या महत्त्वाचे आर्थिक स्रोत म्हणजे कर वसुली असून ती बंद आहे व ग्रामपंचायतीना कर वसुली शिवाय इतर दुसरा कोणताही आर्थिक स्त्रोत नाही त्यामुळे वसुली नाही व इतर गावातील विकासात्मक कामे आहेत ती करायची हा प्रश्न समोर असल्याने सदरची थकीत वीज बिलाची रक्कम जिल्हा परिषद चंद्रपूर यांनीच भरावी.
तसेच महाराष्ट्र शासनाकडून १५ व्या आयोग निधीतून वीज बिलाचा भरणा करणाबाबतच्या सूचना या संबंधीत ग्रामपंचायतीना प्राप्त झालेल्या आहें. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे थकीत विज बिल सुद्धा याच निधीतून भरणा करीत असल्याने निधीची कमतरता पडत असल्याने जास्तीत जास्त म्हणजेच अनेक ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिति ही हलाकीची व दयनीय बनली आहे.
१५ व्या वित्त आयोगाकडू ग्रामपंचायतीना आधीच अपूर्ण निधीं उपलब्ध झालेला आहे व त्यातच थकीत वीज बिलाची रक्कम ही अतिशय जास्त आहे, आणि सदरची निधी हा फक्त विद्युत बिला करीता वापरल्यास ग्रामपंचायत अंतर्गत आदिवासी तांडा क्षेत्र, दलित वस्ती, व मागासवर्गीय वस्तीतील व संपूर्ण विकास कामे व पाणी पुरवठा योजना बंद पडण्याचा धोका आहे, यामुळे वरील सर्व बाबी या विचारात घेता महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी कडून थकीत वीज बिलाची मागणी ही थांबविण्यात येऊन सदरचे थकीत बिल हे जिल्हा परिषद चंद्रपुर यांनीच भरणा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना रुपवंती मधुकर दरेकर सरपंच आनंदवन,योगिता लीलाधर पिंपळशेंडे माजी सरपंच मारडा, देवानंद मोतीरामजी महाजन सरपंच माढेळी, विजेन्द्र बाबाराव वानखेडे सरपंच पाटाळा, बालाजी रामचंद्र जीवतोडे सरपंच शेबळ, अरुण भाऊ खारकर, छबुताई प्रकाश उताने सरपंच वनोज, अंजु रुपेश लांडे ग्राम पंचायत सदस्य,पांझुरणी येथील निर्मला सुनील दडमल सरपंच , गजानन तिरुपती पाटील, मनोरह भाऊ डोरलीकर, गजानन भाऊ काळे, , श्रीकृष्ण जी धुरपुढे वासुदेव भाऊ ठाकरे, सुरजजी मेश्राम, बालाजी काळे, तहूर शेखजी इत्यादी उपस्थित होते.