सासऱ्याचे प्रेत नेताना जावयाचा अपघात, आई व मुलीचं एकाच दिवशी कुंकू पुसलं

प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर

चिमूर – शंकरपुर जवळील हिरापूर येथे सासऱ्याचे प्रेत शवविच्छेदनसाठी नेत असताना वाटेत अपघात होऊन जावयाचा मृत्यू झाला आहे.
ही घटना शनिवारी रात्री घडली असून जावयाचा मृत्यू रविवारी पहाटे झाला आहे.
शनिवारी सायंकाळी सहा वाजता हिरापूर येथील किसन चिडांम यांचा एका शेतावर मृत्यू झाला पोलिसांनी मर्ग दाखल केला असून हे प्रत शवविच्छेदनासाठी त्यांच्या नातेवाईकाकडे सोपविल्या गेलं नातेवाईकांनी गावातील पिकअप भाड्याने घेतली त्या वाहनात प्रेत टाकून गावातील नागरिक व नातेवाईक शवविच्छेदनासाठी चिमूर येथे घेऊन गेले परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होतं प्रेत घेऊन जात असताना पीकअप या वाहनाला चिमूर जवळील खरकडा येथे अज्ञात ट्रकने टक्कर मारले असता त्यात पिकअप मध्ये बसून असलेले वाहन चालकासह इतर सहा लोक गंभीर रित्या जखमी झाले गावातील लोकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले त्यात जावई शंकर गोमा खंडाते 48 यांचा आज रविवारी पहाटे चार वाजता ग्रामीण रुग्णालय येथे मृत्यू झाला तर जखमी मध्ये वाहनचालक रतन सोनटक्के, हरीश पंचवटे, गजानन कनाके, विजय चिडाम(पुतण्या), राजू चिडाम ( पुतण्या) सर्व राहणार हिरापुर तर डोंगरगाव येथील दिलीप गोमा खंडाते(जावयाचा भाऊ) गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे पोलिसांनी अज्ञात चालकविरुद्ध 279,337,338 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.