विजेचा लपंडाव ,शेतकरी चिंतातुर

राळेगाव तालुका प्रतिनिधी :– रामभाऊ भोयर (9529256225)

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कधीतरी पावसाची सर किंवा थोडा वारा ही रात्रीच्या वेळेस आला म्हणजे वीज वितरण कंपनीकडून ग्रामीण भागातील वीज पुरवठा बंद करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याची ओरड सध्या नागरिक करताना दिसून येत आहेत.
वादळी वारा किंवा विज कडकडत असताना वीज गेली तर ठीक आहे परंतु साधा वारा किंवा पावसाचे थेंब ही सुरू झाले तरी वीज गुल होत असल्याने ग्राहकात त्यांच्याविषयी प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे पावसाळ्याला सुरुवात झाली असून जून च्या शेवटचा आठवडा व जुलै चे पहिले एक-दोन आठवडे उन्हाच्या झळा सोबत कधीतरी पावसाच्या सरी कोसळत असतात त्यामुळे अतिप्रमाणात उकाडा होत असल्याने जनता घामाघूम होत असून पंख्याचा किंवा कुलरचा आधार घेण्याच्या स्थितीत असताना शक्यतो ग्रामीण भागात विजेचे भारनियमन करण्याचे प्रकार हे कित्येक वर्षांपासून सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे अशा या प्रकारामुळे जनता त्रस्त झाली असून याच वेळेस हे प्रकार का होतात असा प्रश्न उपस्थित होत आहे
तसेही पावसाळ्यापूर्वी प्री मान्सून कामाला ज्या तारेवरील झाडे तोडणे फांद्या छाटणे जीर्ण तारा बदलणे किंवा इतर तांत्रिक बाबीतुन कामे आटोपली असली तरी वादळी वारा नसतानाही वीजपुरवठा खंडित होतोच कसा असाही प्रश्न उपस्थित होत आहे गेल्या महिन्याभरापासून तर ग्रामीण भागात दिवसभऱ्यातून वारंवार तास न तास वीज गायब होत आहे संध्याकाळी व रात्री देखील असाच प्रकार सुरू असल्यामुळे वीजग्राहक सध्या त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वारंवार खंडित होणार वीज थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.