
मौजे सारखनी येथे दोन तालुक्यातील चांगली बाजार पेठ असून दोन्ही तालुक्याच्या मध्य ठिकानी मौजे सारखनी आहे
सारखनी लगत अनैक ग्रामीण गांव जुळलेले असून सदरिल गावातील प्रशासकिय कर्मचारी यांची राहण्याची पहिली पसंती मौजे सारखनी आहे त्यामुळे बाजार पेठ आणि घरे बांधनीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे
आणि याचाच फायदा अनैक रेती तस्कर आणि अवैद्य धंदे करणारे घेत असल्याचे कधी रात्रिला तर कधी भर दिवसा पहायला मिळत आहे
दोन्ही तहसील कार्यालयचे अंतर अंदाजे 25 km असल्यामुळे रेती बचाव करण्यास महसूल विभागाला पुरेसा वेळ मिळत नाही आणि याचाच फायदा घेत मौजे सारखनी येथून अवघ्या 6 ते 7 km वर असलेल्या नदी पात्रातुन रेती तस्कराना रेती लंपास करण्यास पुरेसा वेळ मिळत असल्यामुळे मौजे सारखनी येथे पोलिस चौकीची आणि ग्राम रक्षक दलची मांगनी जनतेच्या वतीने केली जात आहे
घटनेची दखल घेत वरिष्ठ अधिकारी यांनी ग्राम रक्षक दल आणि पोलिस चौकी मौजे सारखनी येथे स्थापन करुण अवैद्य धनद्यांना आळा घालावा
