उमरी बाजार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी यांचा कडून शेतकरी यांच्या सोबत अवहेलनि वागणूक

1

अतिवृष्टी मुळे शेतकरी पणाला टेकलेले पाहायला मिळत आहे
स्वता ला गहान ठेवून जगाचा जगाची भूक भागवणारा शेतकरी
आज त्याच्या पोशाखामुळे बऱ्याच शासकीय कार्यालयात मानहानी सहन करतांना पाहायला मिळत आहेयाचेच एक उदाहरण नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामधील उमरी येथे कार्यरत असलेली महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पाहायला मिळाले
शेतीकर्ज/क्रबलोन करीत शासकीय आदेशानुसार शेतकरी उमरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत मांगील 6 महिन्यापासून येजा करत आहेत
सदरील बँकेच्या शाखा व्यवस्थापकास भेटायचे असेल तर आटापिटा करून शाखा प्रबंधक यांची भेट झाली असता त्यांची भेट झाल्यावर कपडे चांगले नसल्यामुळे त्यांच्या कडून अपमान सहन करावा लागतो आणि शेवटी त्यांच्या कडून शेतकऱ्यांना तारिख दिल्या जाते असे मनोगत उमरी भागातील शेतकऱ्यांन कडून ऐकावयास मिळाले आहे
सदरील विषयाची दखल घेत शेतकऱ्यांनि शाखा व्यवस्थापका सह इतर कर्मचारी यांच्या बदलीची मागणी केलेली आहे