जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड च्या शाखा सारखणी च्या चेअरमन पदी विराज पाटील शिंदे हे बिनविरोध विराजमान


शेतकरी खातेदारांना हक्काचा माणूस मिळाल्याने शेतकरी वर्ग आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले

मौजे सारखनी येथे
जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड ची शाखा असून सदरील शाखेवर चेअरमन पदी सिख धानोरा येथील श्री युवराज धनराज शिंदे यांची बिन विरोधी निवड झाली असून
सदरील शाखेचे शेतकरी खातेदार यांना हक्काचा माणूस मिळाला म्हणून शेतकरी सुखाचा आनंद घेत असल्याचे शेतकऱ्यानि मनोगत व्यक्त केले आहेत
पैसे उचल करण्या साठी शेतकरी वर्गाला बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागत असे पण श्री युवराज धनराज शिंदे हक्काचा माणूस चेअरमन झाल्याने शेतकऱ्याला सदरील अडचणी ला सामोरे जावे लागणार नाही असे देखील शेतकऱ्यांनी सांगितले आहे