
मौजे सारखणी येथील देशी व विदेशी दारूच्या दुकानातून शेजारच्या गावात ब्लॅक मध्ये जातात दारू च्या पेट्या?
नागरिकांनी तक्रार करावी कुठे?
दुकान दारांची पोलीस प्रशासना कडून केली जाते पाठ राखण?.मौजे सारखणी येथील देशी दारूच्या दुकानातून दिवसा ढवळ्या शेजारच्या गावात शासकीय नियमांचे उल्लंघन करून देशी दारू आणि विदेशी दारूनच्या पेठ्या शेजारच्या गावात पाठविल्या जात असल्याची तक्रार मौजे सारखणी लगतच्या गावातील नागरिकांन कडून ऐकण्यात येत आहे
शेतीच्या कामातून महिला वर्ग जे काही आठवड्या काठी मजुरी मिळवतात त्यातून उदरनिर्वाह करण्यास महिलांना चिकाटीच्या कसरत करावी लागतेच पण दारू गावात मिळत असल्याने आता महिलांचे आठवड्याचे गणित खोळंबले असल्याची प्रतिक्रिया महीलांन कडून ऐकावयास मिळत आहे.मौजे सारखणी सोबत शेजारी गावातील लहान मुलांचे दारू पिण्याचे वाढते प्रमाण हे गांभीर्याचे असल्याने पोलीस प्रशासन या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतात का हा चर्चेचा विषय झाला आहे
पोलीस प्रशासनाने या कडे लक्ष देऊन कार्यवाही करत महिलांना यातून सुटकेचा श्वास द्यावा असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे
