

प्रतिनिधी:गजानन पवार तालुका किनवट
मौजे सारखनी येथे ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ग्राम पंचायत मेंबर सुनीता देवराव कुडमते यांनी चौकशी ची मांगणी केली असता सदर चौकशी मद्ये मौजे सारखनी येथील ग्राम पंचायत सेवक पदावर कार्यरत कर्मचारी श्री संजय अंबादास वानखेडे एकाच दिवशी रोजगार हमी योजनेतील विहीर कामावर कार्यरत असल्याचे आणि ग्राम पंचायत कार्यालय येथे कार्यरत असल्याचे आढळून आले असून ग्राम पंचायत कार्यालयिन ग्राम सेवक यांनी दिलेल्या अहवालात श्री संजय अंबादास वानखेडे यांनी अधिकार नसतांना सामान्य कर वसुली करण्या साठी (घर टॅक्स,फेरफार निधी,नळ पट्टी) अनधिकृत पावत्याचा वापर करीत निधी जमा केल्याचे समोर आले
सदरील प्रकरणी ग्राम सेवक श्री एस. एल. ताडेवार यांना गट विकास अधिकारी यांनी श्री संजय अंबादास वानखेडे यांच्या वर रीत सर कार्यवाही चे आदेश दि. 06/04/2021 रोजी दिले होते सदरील आदेशास 3 महिने होत आले असून सदरील प्रकरणात सावरा सावर करत असल्याचे दिसून येत आहे
सुनीता देवराव कुडमते यांना न्याय मिळत नसल्या मुळे न्याय प्राप्ती पर्यंत आमरन उपोषण आज दि. 25/06/2021 रोजी पासून सुरू केले आहे
लोकप्रतिनिधी असून न्याय मिळवण्या साठी उपोषणास बसावे लागत असल्या मुळे सुनीता देवराव कुडमते यांनी शोकांतिका व्यक्त केली आहे
प्रतिनिधी: प्रशांत बदकी
