मौजे सारखनी येथिल MSEB चा मनमानी कारभार लाइन मन दांडे देतात अवैद्यरित्या विज पुरवठा विरोध केल्यास पाठवतात अतिरिक्त बिल

मौजे सारखनी येथील MSEB सब स्टेशन येथुन बऱ्याच गावाला विज पुरवठा केला जातो.
सदर विज पुरावठा हा रित्सर व्हावा या करिता MSEB विभागा अंतर्गत कर्मचारी नेमनुक करण्यात आला आहे .मौजे सारखनी येथिल लाइनमन दांडे आणि महिन्या काठी मीटर रीडिंग घेणारे हे संगनमताने ग्राहकाना बिल पाठवत असल्याचा आरोप मौजे सारखनी येथील ग्राहक करत आहेत.
तसेच लाइन मन दांडे यांच्या उपस्थित ज्यांच्या कड़े मीटर नाहीत त्यांना इतर अवैद्य विज पुरावठा करुन देतात असेही ग्राहकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.मीटर रिडींग न घेताच परस्पर बिले देण्याचे काम सर्रास सुरू असल्याचे बोलले जात आहे या मध्ये फटका मात्र सामान्यांना बसत आहे.मौजे सारखनी,दहेली,करंजी या सारख्या अनैक गावातील शेतकरी विज पुरवठा होत असलेल्या फ्यूज कॉल मुळे त्रस्त असल्याचे दिसून येत आहे
MSEB विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी मौज सारखनी येथिल कर्मचारी यांच्या कड़े विशेष लक्ष देण्याची गरज आहे.मौजे सारखनी येथिल नामे विशाल दत्ता पवार या ग्राहकाला माहे फेब्रूवारी महिन्याचे बिल त्यांना 1660/- रूपये इतके आले होते आणि माहे मार्च महिन्यात त्यांना 8640/- रूपये इतके बिल
आलेले आहे सदर वाढीव बिल हे त्यांना जाणीवपूर्वक पाठवण्यात आले असल्याचे विशाल पवार यांनी सांगितले आहे.