
किनवट-माहूर तालुक्यात काही महिन्या पासून मोबाइल चोरीचे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात समोर येत होते पण चोरांच्या चतुराईवर सिंदखेड पोलीस स्टेशन चे स पो नि मा. तिडके साहेब यांनी स्टिंग ऑपरेशन करून चोरट्यांना चोरी करते वेळेस हातो हात बेड्या घातल्या
सदरील चोरट्यांनी आठवडी बाजारात भाजी पाला खरेदीचे सोंग घेऊन खिशाला काप लावून मोबाईल चोरी करत होते
मौजे सारखनी येथील आठवडी बाजारात सिंदखेड पोलीस स्टेशन चे लक्ष लागले होते पण आरोपी चपळ असल्याने साधे पानाचे स्वरूप घेऊन चोरट्यांना पकडण्याची मोहीम सुरू होती फळ आणि भाजीपाला विक्रेते
मा. नांदगावे साहेब यांच्या संपर्कात होते सुमारे 4 वाजता एक चोर निदर्शनास आले आणि
सहकारी असलेले फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांनी मा. नांदगावे साहेब यांना संपर्क करून चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले
अश्या तर्हेने फळ-भाजीपाला विक्रेते आणि पोलीस सिंदखेड चे स पो नि मा. तिडके साहेब यांनी मिळून मोबाईल चोरट्यांना पकडले
सदरील पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे नागरिकांन कडून आभार व्यक्त केला जात आहे
