जिल्हा परिषद शाळा दहेली येथे पाल्याचा दाखला मागायला गेलेल्या वडिलाला शिक्षकाकडून अपमानास्पद वागणूक ,दाखल्यासाठी मागितला ज्योतिबा फुले यांचा फोटो

जिल्हा परिषद शाळा दहेली येथे पाल्यांचा दाखला मागायला गेलेल्या पालकास मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या कडून अपमानास्पद वागणूक
शालेय समिती सह गट शिक्षण अधिकारी साखर झोपेत

महात्मा जोतिबा फुले ज्यांनी देशाला शिक्षणाचा आधार दिला आज त्यांचाच समाज शिक्षणा पासून वंचित ठेवला जात आहे

मौजे दहेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी यांचे शालेय व्यवस्थापना वरती लक्ष नसल्याचे पाहण्यास मिळाले
मौजे दहेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विध्यार्थी दुर्गेश विठ्ठल आदे इयता चौथी मध्ये शिकत आहे
दुर्गेश चे वडील यांनी पाल्याची आणि शाळेची पाहणी केली असता पाल्याचे शिक्षण अर्धवट असल्याचे त्यांच्या लक्षात आले पाल्यास चांगले शिक्षण मिळावे या करिता पालकानी जे काबाड कष्ट केले होते ते पालकाला धुळीस जात असल्याचे दिसून आले म्हणून पालकानी आपल्या पाल्याचा दाखला मागितला असता मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी पिसे सर यांचे दार दाखविले पिसे सर यांनी कांबळे सर यांचे दार दाखविले पालक यांनी कांबळे सर याना दाखला मागितला असता त्यावर कांबळे सर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या फोटो ची मांगणी केली पालक विठ्ठल आदे यांनी होकार दिला असता शिक्षक कांबळे यांनी सांगितले की जेव्हा तुम्ही फोटो देणार तेव्हाच तुम्हाला आम्ही तुमच्या पाल्यांचा दाखला देऊ म्हणून दाखला देण्यास नकार दिला
पालकांनी महामुने गट शिक्षण अधिकारी यांच्या कडे संपर्क केला असता गट शिक्षण अधिकारी यांनी पालक विठ्ठल मारोती आदे याना कसलेही उत्तर दिले नाही
पालक विठ्ठल मारोती आदे यांना अपमानस्पद वागणूक दिल्याने जण सामन्यात पाल्याच्या भविष्या बाबद चिंता निर्माण झाली आहे