
संगणक परिचालक यांच्या जीवाची csc कंपनीला काळजी नाही आत्मदहन कर्त्याचे मन परिवर्तना साठी साधा फोन सुद्धा केला नाही
जिल्हा व्यवस्थापक आणि तालुका व्यवस्थापक यांच्या निलंबनाची मागणी खासदार हेमंत पाटील यांच्या कडे उपोषण कर्त्याच्या कुटुंबियाने केली आहे.
मौजे बोथ ग्राम पंचायत मधील संगणक परिचालक गजानन पवार रा सारखनी यांच्या सुमारे 13 महिन्याचे csc कंपनी कडून प्रलंबित असलेले मानधन मिळणे बाबत गजानन पवार यांनी तालुका तथा जिल्हा व्यवस्थापक यांच्या कडे पाठपुरावा केला होता पण सतत बोलून पाठपुरावा करून सुद्धा तालुका आणि जिल्हा व्यवस्थापक कडुन अपेक्षित उत्तर न मिळाल्याने गजानन पवार यांनी परिस्थिति समोर हात टेकत शेवटी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. आणि निर्णयाचा पाठ पुरावा प्रशासकीय कार्यालय आणि मुख्यमंत्री यांना पत्रा द्वारे केला होता .
प्रशासना कडून आत्मदहन परावृत्त करण्यास पोलीस स्टेशन सिंदखेड चे सहायक पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र तिडके आलेत
पण csc कंपनी कडुन तालुका व्यवस्थापक आणि जिल्हा व्यवस्थापक यांच्या पैकी कोणीच आले नाही.
मानधन प्रलंबित असल्याने उपास मारीची वेळ आली म्हणून गजानन पवार यांनी सदरील पाऊल उचलले पण कंपनीची चूक असताना सुद्धा कंपनीने कोणालाच का नाही पाठविले किंवा एखादे आश्वासन पत्र का नाही दिले माझ्या मूलाच्या जीवाला यांच्या कडून धोका निर्माण झाल्या मुळे सदरील व्यक्तींना पदावरून निलंबित करा अशी मांगणी गजानन पवार यांच्या कुटुंबाने पत्रा द्वारे खासदार हेमंत पाटील यांच्या कडे केली आहे.
