
मल्हार शिवरकर स पो नि मांडवी यांच्या कडून धंदे बंद करण्यास सरपंच आणि महिलांना उडवा उडविची उत्तरे
पोलीस स्टेशन मांडवी अंतर्गत येणाऱ्या उमरी बाजार येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या बोथ गावात खुले आम दारू विक्री वरळी मटका गुटखा विक्री असे अवैध धंदे खुले आम सुरू असून पाऊस पाण्यात महिला ह्या प्रामुख्याने शेतीच्या कामात गुंतून असताना या संधीचा फायदा घेत दारू च्या आणि अवैध धंद्याच्या आहारी गेलेले नागरिकांन कडून स्वस्त राशन आणि घरातील भांडी विकून दारू आणि इतर अवैध धंद्याची जोपासना सुरू असल्याने मौजे बोथ येथील सरपंच आणि वरिष्ठ नागरिक तथा महिलांनी सदरील घटनेची दखल घेत मांडवी पोलीस स्टेशन येथे तक्रार करत मौजे बोथ येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यास बंद करण्याची मांगणी एक महिन्या अगोदर केली
पण कानावर न आल्यासारखी वागणूक पोलीस स्टेशन मांडवी यांच्या कडून होत असल्याचे महिला आणि सरपंच यांच्या लक्षात येताच त्यांनी परत पोलीस स्टेशन मांडवी येथे अवैध धंदे सुरूच असल्याची कल्पना दिली तरी सुद्धा पोलीस स्टेशन मांडवी यांच्या कडून दखल घेतली जात नसल्याने
मौजे बोथ येथील सरपंच आणि वरिष्ठ महिलांनी नांदेड येथे जाऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे पोलीस स्टेशन मांडवी यांचे काम काज कश्या प्रकारे होत असल्याचे सांगायचे ठरवले आहे
