



किनवट – माहूर राज्य महामर्गाचे काम शारदा कंस्ट्रकशन यांच्या कडून जलद गतीने सुरु असुन सदर मार्गाचे नवनी करणावर लक्ष ठेवण्याची जवाबदारी शासकीय कर्मचारी आणि अभियंता यांची असताना पण सदर काम निकृष्ट दर्जेचे होत असल्याने
कामा संबंधित कर्मचारी यांच्या वर पैसे खाल्याचा आरोप जनते कडून केला जात आहे.
मार्गाच्या कामात पूरक सामग्री वापरली गेली नसल्याने मार्गाचे काम पूर्ण होन्या आधीच खंडित होत असुन मार्गा वरील खडयाला बस देखील कल मारत अस्ताना दिसून येत आहे.
जनतेच्या जीवाला शासन दरबारी काड़ी ची किमत नाही का असा रोचक सवाल जनते कडून विचारण्यात येत आहे.
एकंदरीत या कामावर काय कारवाई केली जाते की नेहमीप्रमाणेच या वेळेसही या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष करून जनतेच्या जीवाशी खेळ होतो हे पाहणे विशेष ठरणार आहे.
