
गट विकास अधिकारी यांचे भान ग्राम सेवक यांच्या वरती नसल्याने ग्राम सेवक अधिकाऱ्यांचे लूट करण्याचे कारनामे सातत्याने किनवट तालुक्यातील ग्राम पंचायती मध्ये पाहायला मिळत आहे
ग्राम सेवक विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे सगळे घेऊन देऊन एकामेकांना सहकार्य करत असतात?पण आता तर मौजे सारखनी येथे ग्राम सेवक वाडेकर यांनी हद्द केल्याचे पाहायला मिळाले आहे. गजानन बावणे यांनी ग्राम सेवक यांना गावठाण प्रमाण पत्र मांगीतले असता वाडेकर ग्राम सेवक यांनी चक्क 10000/- दहा हजार रुपयांची मां
मागणी केली गजानन बावणे यांनी गरिबी दाखवत काही पैसे कमी करण्याचे सांगितले असता शेवटी 2000 दोन हजार घेऊन वाडेकर ग्राम सेवक यांनी गावठाण प्रमाण पत्र दिले असा दावागजानन बावणे यांनी केला.
ग्राम सेवक यांना सरकारी पगार असून गरीब नागरिकांनकडून लाच खाताना लाज कशी नाही वाटत अशी चर्चा परिसरात जोर धरत आहे
वरिष्ठ अधिकारी यांनी घटनेची दखल घेऊन योग्य चौकशी करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे
