किनवट रेल्वे स्टेशन येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान द्वारा बचत गटाचे उत्पादित वस्तू विक्री केंद्राचे उदघाटन संपन्न

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत व एक स्टेशन एक उत्पादन मोहिमे कडून आज दि 23 जुलै 2022 ला दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळातील किनवट स्टेशन ला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,अभियान कक्ष किनवट द्वारा बचत गटाने उत्पादित वस्तू विक्री केंद्राचे उदघाटन संपन्न झाले
सदर केंद्रात अनुसया महिला स्वयं सहाय्यता समूह काजीपोड यांनी बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तु विक्री साठी ठेवण्यात आले
सदर विक्री केंद्राचे उदघाटन स्टेशन प्रबंधक मा,श्री अरविंद कुमार यांनी केले तसेच मा.मनोज कुमार CCI आदीलाबाद,मा.विनोद मगर शाखा सचिव किनवट ,मा.पांडुरंग हटकर,मा.सचिन दुधारे,मा.मनोज कुमार Jr, telecom हे उपस्तीत होते सदर केंद्र उभारणीसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक मा.श्री पातेवार साहेब,मा.श्री राठोड साहेब,मा.श्री.धनंजय भिसे साहेब मा.भिसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अभियान व्यवस्थापक मा.श्री गौतम वाहुले,प्रभाग समन्वयक श्री.ईश्वर आडे,कौशल्य समन्वयक श्री श्रीनिवास दरलावार यांनी अथक परिश्रम घेतले